माझे गाव निबंध
मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील गिरवी आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे.
माझ्या गावात एक मोठा ओढा आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या ओढ्यात आंघोळीला जातो. ओढ्याच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुले जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.
माझ्या गावात प्रसिद्ध भगवान भैरव नाथाचे मंदिर आहे. चैत्र महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान भैरव नाथाच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमानात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत.
माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment