माझी आवडती कला साहित्य

 माझी आवडती कला साहित्य 



मानवाच्या जीवनात कलेला खूप महत्व आहे . कला हा एक संस्कृत शब्द आहे.  इतिहास व आपल्या संस्कृतीत कलेचा संबंध हा सौंदर्य, सुंदरता आणि आनंदाशी आहे. आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्य रूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय. कलेचे अनेक प्रकार आहेत. चित्र, नृत्य, मूर्ती, वाद्य, साहित्य, लेखन, संगीत, काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत. 



परंतु माझी आवडती कला साहित्य कला आहे. साहित्य कला समाजाला सुदृढ बनवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते. असे म्हटले जाते की साहित्य हे समाजाचे आरसे आहे. साहित्य समाजात संवेदना जागृत करते. प्राचीन व आधुनिक काळातील गोष्टी, महाकाव्य आणि पवित्र ग्रंथ साहित्य म्हणूनच ओळखले जातात. साहित्याच्या मदतीनेच इतिहास आणि ऐतिहासिक घटनांना समजले जाऊ शकते. 



साहित्याच्या मदतीने आपण आपल्या विचारांना लेखणी द्वारे लिहू शकतो. आपल्या देशात असे अनेक महान व्यक्ती होऊन गेलेत ज्यांनी साहित्य कलेच्या माध्यमाने अनेक प्रसिद्ध कविता, उपन्यास, गोष्टी, निबंध आणि कादंबरी लिहिल्या आहेत. निर्जीव पात्रांना सजीव करण्याची शक्ती साहित्य कलेत असते. खरे साहित्य तेच असते ज्यात उच्च चिंतन असते, सौंदर्याचा सार असतो, स्वाधीनतेचा भाव असतो, सूर्जन करण्याची आत्मा आणि जीवनाची सत्यता असते. 



मला देखील कविता व लेख लिहायला आवडते. मी आमच्या स्थानिक वृत्तपत्रात अनेकदा लेख लिहून पाठवले आहेत. सामाजिक व शैक्षणिक विषयांवर मी लिखाण केले आहे. धूम्रपानाने होणारे दुष्परिणाम या विषयावरील लेखामुळे मला 500 रुपये मानधन देखील देण्यात आले होते. मी दररोज काही न काही लिहीत असतो. लेखन करणे हा माझा छंदच आहे. माझे भविष्यात एक आदर्श लेखक बनण्याचे स्वप्न आहे. 



साहित्य हे जगाला एका नवीन पद्धतीने पाहण्याची क्षमता प्रदान करते. साहित्य वाचकाला विश्वास प्रदान करते, त्याला नैतिक शिक्षण देऊन योग्य निर्णय घेण्यासाठी शिकवण व प्रोत्साहन देते. वर्तमान काळात साहित्याने अनेक पुस्तकालयांना‌ संपन्न केले आहे. लोकांच्या मनात मानवता आणि जिज्ञासा निर्माण केली आहे. साहित्य नेहमी ज्या युगात लिहिले गेले त्याच युगाला प्रतिबिंबित करते. साहित्याच्या अध्ययनाने आपण त्या विशिष्ठ काळातील विशेष गोष्टी समजू शकतो. जेव्हा आपण साहित्याचे अध्ययन करतो तेव्हा योग्य भाषेची शैली आपल्या लक्षात येते. 



मराठी साहित्यात कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर यांना मराठी साहित्याचे जनक म्हटले जाते. या शिवाय विष्णु वामन शिरवाडकर, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, प्रहलाद केशव अत्रे, शिवाजी सावंत, विंदा करंदीकर इत्यादी प्रसिद्ध लेखक आहेत. संस्कृत साहित्यात कालिदास, भवभूती, भानुभट्ट इत्यादी आणि इंग्रजी भाषेत शेक्सपियर, विल्यम वर्डसवर्थ, जॉन किट्स हे प्रसिद्ध लेखक आहेत. 



साहित्य संगीत कला विहीन: , साक्षात पशु पुच्छ विषाण विहीन: 

तृणम न खाद्न्नपि जीवमान: , तद भाग देयम परम पशुनाम 

या श्लोकानुसार जो मनुष्य साहित्य, संगीत अथवा कलेशिवाय जीवन व्यतीत करतो, तो साक्षात बिना शेपटी आणि शिंगांचा पशू असतो. अशा प्रकारच्या जीव गवत न खाता अन्न खाऊन जिवंत राहतो. कलेशिवाय जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीत पशु म्हटले आहे. याचा अर्थ होतो की साहित्य ही कला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही कला वेळोवेळी आपल्याला ज्ञानाने ओतप्रोत करते. म्हणूनच म्हटले जाते कलेवर प्रेम करा तुमचे जीवन आनंदी होईल .

स्त्रोत : Google 

Post a Comment

Previous Post Next Post