माझा आवडता प्राणी कुत्रा
माझा आवडता प्राणी कुत्रा आहे आणि आमच्या घरी सुद्धा आम्ही एक कुत्रा पाळला आहे, त्याचे नाव मोती आहे. मोती खूपच बहादुर आहे त्याचा रंग पांढरा आहे आणि मोठ मोठे कानासोबत वाकडी शेपटी आहे. त्याचे डोळे भुरे आहेत. मोती आमच्या कुटुंबाच्या सदस्या प्रमाणेच आहे. मला तो खूपच आवडतो. मी त्याच्या सोबत सकाळ संध्याकाळ खेळतो. मी त्याला रोज फिरवायला पण नेतो.
माझ्या 10 व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला मोती भेट म्हणून आणून दिला होता. मला आजवर मिळालेल्या भेट वस्तूंपैकी मोती हे सर्वात जास्त आवडते गिफ्ट आहे. त्याला आमच्यासोबत राहायला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मोतीची आणि माझी खूप घट्ट मैत्री आहे. मी त्याला बसायला सांगितले तर तो बसतो, उभे राहायला सांगितले तर उभा राहतो आणि माझ्यासोबत पळायला सांगितले तर पळतो देखील. थोडक्यात सांगायचे झाले तर मोती माझ्या सर्व आज्ञा पाळतो.
कुत्रा कोणताही असो तो खूपच उपयोगी प्राणी असतो त्यांच्या असल्यानेच घर सुरक्षित वाटते. त्याच्या उपस्थितीत कोण्या अनोळखी व्यक्तीची घरात येण्याची हिम्मत देखील होत नाही. आम्हालाच नव्हे तर आमच्या शेजारीना देखील मोती कुत्र्या मुळे सुरक्षित वाटते. त्याचे भुंकणे वाघाच्या डरकाळी सारखे वाटते. तो असला की दुसरे कुत्रे आमच्या घराच्या जवळ पण येत नाहीत. जर कोणी अनोळखी आमच्या घरी किंवा शेजारी आले असेल तर मोती भुंकुन सर्वांना सावध करतो. परंतु त्याला शांत बसायला सांगितले की लगेच ऐकुन शांत देखील होतो.
मी मोतीची खूप चांगली काळजी घेतो. त्याला खाऊ घालने, अंघोळ घालण, रोज फिरवायला नेणे ई. गोष्टी मी वेळेवर करतो. माझे वडील महिन्यातून एकदा प्राण्यांच्या दवाखान्यात चेक अप करायला पण घेऊन जातात. आमचा कुत्रा पूर्णपणे शाकाहारी आहे आम्ही त्याला कधीच मास खाऊ घातलेले नाही. त्याचे आवडते जेवण पोळी आणि दूध आहे. मोती आमच्या बोलण्याला खूप चांगले समजतो. आमची आज्ञा पाळतो. तो खूपच वफादार, बहादुर आणि गोंडस आहे. म्हणून मला माझ्या पाळीव कुत्रा मोतीवर अभिमान आहे.
आज मोती व त्यासारखे अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे जगभरात पाळले जातात. कुत्र्यांच्या मदतीनेच पोलिस मोठमोठे केस सोडवतात. या कुत्र्यांच्या सुंघण्याची शक्ती अदभुत असते. हे डाकू व चोरांचा वास घेऊन त्यांना शोधून काढतात. या कुत्र्यांना विमानतळ, पोलिस स्टेशन, देशाच्या सीमा आणि शाळांमध्ये नियुक्त केले जाऊ शकते. या शिवाय बरेच ट्रेकर्स, ट्रेकिंग दरम्यान शिकरासाठी शिकारी कुत्र्यांचा वापर करतात. शिकारी कुत्रे लांडग्याची देखील शिकार करतात.
जगभरातील प्रत्येक ठिकाणी कुत्रे आढळतात. कुत्रा खूपच वफादार आणि इमानदार प्राणी असतो. त्याची बुद्धी तल्लख, सूंघण्याची क्षमता तीव्र आणि नजर तीक्ष्ण असते.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Source: Internet
Post a Comment