समास

 समास         

जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा


 शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या


 एकीकरणाला समास  असे म्हणतात. अशा रीतीनेतयार झालेल्या ह्या


 जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.


उदाहरणार्थ :


राजाचा वाडा-राजवाडा


राम आणि लक्ष्मण-रामलक्ष्मण


साखर घालून केलेला भात-साखर भात.


यातील राजवाडा, रामलक्ष्मण आणि साखरभात हे सामासीक शब्द आहेत.


समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या


 शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे


 साहाय्य घेऊन त्याची फोड करावी लागते. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला त्या


 समासाचा विग्रह Samas Vigrah करणे असे म्हणतात. समास हा


 एक मराठी व्याकरण चा महत्वाचा विषय आहे.


समासाचे प्रकार


अव्ययीभाव समास


तत्पुरुष समास


द्वंद्व समास


बहुव्रीही समास


पहिले पद मुख्य, दुसरे पद मुख्य, दोन्ही पदे मुख्य, दोन्ही पदे गौण


अव्ययीभाव समास


अव्ययीभाव समास : यात पहिले पद प्रधान (महव्वाचे) असून असते किंवा


 अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय


 असतो.


अव्ययीभाव समासाचे उदाहरण :


आमरण-मरणापर्यंत


घडोघडी-प्रत्येक घडीला


गावोगाव-प्रत्येक गावी


यथाशक्ती-शक्तीप्रमाणे


अजन्म-जन्मापासून


प्रतिवर्ष-दर वर्षाला


तत्पुरुष समास


तत्पुरुष समास: ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह


 करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो,


त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.


ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष




 समास असे म्हणतात.




तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.




उपप्रकार पुढीलप्रमाणे.




विभक्ती तत्पुरुष समास –


समासाचा विग्रह करतांना गाळलेला विभक्तिप्रत्यय किंवा गाळलेले शब्द


 विग्रहामध्ये घालावे लागतात.


विभक्ती तत्पुरुष समास उदाहरणे .


कष्ट साध्या-कष्टाने साध्य


शास्त्रसंपन्न-शास्त्रात संपन्न


देवपूजा - देवाची पूजा


कर्मधारय समास :


हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार तयारअसून त्यात दोन्ही पदांची विभक्ती


 प्रथमा असते. त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.


कर्मधारय समास उदाहरणे


महादेव-महा असा देव,


सुवासना- सु अशी वासना,


पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष,


घनश्याम-घनसारखा श्याम,


द्विगू समास


यात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण  असून संपूर्ण सामाजिक शब्दाला


 समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो.


द्विगू समास उदाहरणे :


त्रिभुवन-तीन भुवनांचा समुदाय,


पंचपाळे-पाच पाळ्यांचा समुदाय,


मध्यमपद लोपी समास –


यात विग्रह करतांना दोन पदांतील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून


 दाखवावे लागतात.


मध्यमपद लोपी समास उदाहरणे.


बटाटेभात-बटाटे घालून केलेला भात,


वांगीपोहे- वांगी घालून केलेले पोहे,


पुरणपोळी-पुरण घालून केलेली पोळी,


लंगोटीमित्र-लंगोटी घालत असल्या वेळेपासूनचा मित्र.


नत्रतत्पुरुष समास:


यातील पहिले पद अ, अन् किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त


 होतो. दुसरे पद जर स्वरादी असेल तर पहिले पद अन् हे असते.


उदाहरणे:


अन् + आदर – अनादर = आदर नसलेला


न + गण्य = नगण्य = गण्य नसलेला


उपपद तत्पुरुष :


या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदन्ताचे रूप असते.


 म्हणजे एखाद्या धातूचा एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा


 अक्षर यात असते.


उदाहरणे


हर्षद-हर्ष देणारा,


नाटककार-नाटक लिहिणारा,


पंकज – पंकात जन्मलेले,


जलद-जल देणारा


व्दंव्द समास :


ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द


असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी


 अव्ययांनी जोडलेली असतात.


व्दंव्द समासाचे उदाहरणे :


 


बहीणभाऊ  – बहीण आणि भाऊ


आईवडील – आई आणि वडील


स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष


कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन


ने-आण  – ने आणि आण


दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर


रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण


विटीदांडू – विटी आणि दांडू


पापपुण्य – पाप आणि पुण्य


व्दंव्द समासाचे खलील ३ प्रकार पडतात.


इतरेतर व्दंव्द समास


ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी


 अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.


इतरेतर व्दंव्द उदाहरणे


आईबाप – आई आणि बाप


हरिहर – हरि आणि हर


स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष


कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन


वैकल्पिक व्दंव्द समास


ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक


 उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द


 समास असे म्हणतात.


उदाहरणे


खरेखोटे – खरे आणि खोटे


तीनचार – तीन किंवा चार


बरेवाईट – बरे किंवा वाईट


पासनापास –  पास आणि नापास


मागेपुढे – मागे अथवा पुढे


समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच


 जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो


 त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.


उदाहरणे


मिठभाकर –  मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी


चहापाणी –  चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ


भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु


अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्‍या वस्तु व


 इतर कपडे


शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता


केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ


बहुव्रीही समास :


ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या


 अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही


 समास असे म्हणतात.


उदाहरणे


नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)


वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)


दशमुख  – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)


बहुव्रीही समासाचे खालील ४ उपपक्रार पडतात.


विभक्ती बहुव्रीही समास


ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा


 सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते


 त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.


उदाहरणे.


प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती


जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती


जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती


गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती


पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती


त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती


नत्र बहुव्रीही समास


ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे


 म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक


 शब्दांचा वापर केला जातो.


उदाहरणे.


अनंत – नाही अंत ज्याला तो


निर्धन – नाही धन ज्याकडे तो


नीरस – नाही रस ज्यात तो


अनिकेत – नाही निकेत ज्याला तो


अव्यय – नाही व्यय ज्याला तो


सहबहुव्रीही समास


ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा


 सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही


 समास म्हणतात.


उदाहरणे


सहपरिवार – परिवारासहित असा जो


सबल – बलासहित आहे असा जो


सवर्ण – वर्णासहित असा तो


सफल – फलाने सहित असे तो


सानंद – आनंदाने सहित असा जो


प्रादिबहुव्रीही समास


ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी


 युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.


उदाहरणे


सुमंगल – पवित्र आहे असे ते


सुनयना – सु-नयन असलेली स्त्री


दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती


प्रबळ -अधिक बलवान असा तो


विख्यात – विशेष ख्याती असलेला


प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post