नदीचे आत्मवृत्त
मी एक नदी आहे. मला अनेक नावांनी ओळखले जाते जसे नदी, नहर, सरिता, प्रवाहिनी, जीवनदायिनी इत्यादी. ही सर्व नावे माझा स्वभाव आणि गती च्या आधारावर ठेवली आहेत. सर सर आवाज करीत वाहिल्याने मला सरिता म्हटले जाते. नेहमी प्रवाहात वाहिल्याने मला प्रवाहिणी म्हणतात. मी पाण्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेते. पाण्याला जीवन म्हटले जाते आणि मी पाण्याचा स्त्रोत असल्याने मला जीवनदायिनी म्हणतात.
साधारण भाषेत तुम्ही मला नदी म्हणू शकतात. माझे दररोजचे काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत, पृथ्वीवरील पशुपक्षी, मनुष्य व झाडाझुडपांची तहान भागवणे आहे. मी जेथे जाते तेथे मनुष्य, पशु पक्षी आणि झाडांची तहान भागवून त्यांना तृप्त करते. माझ्या पाण्यामुळे झाले हिरवी व टवटवीत बनतात. मी हे कार्य नित्य करीत असते व यातच माझ्या जीवनाची सार्थकता आहे.
आज मैदानी भागात मी ज्या रूपात दिसते, त्या रूपात मी नेहमी पासून नव्हते. माझी सुरुवात हिमालय मधील बर्फाच्या पर्वतात दगडांच्या खाली झाला होता. मी एका शिलालेखातून उत्पन्न होऊन मधुर संगीत करीत पुढे सरकू लागले. जेव्हा मी प्रवाहाने वाहत होते तेव्हा माझ्या मार्गात अनेक अडथळे यायला लागले. या मध्ये लहान मोठे दगडगोटे, झाडे झुडपे आणि मोठ मोठ्या पर्वतांचा समावेश होता. या सर्वांनी एक एक करून माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझे संपूर्ण बळ लाऊन त्यांच्यातून मार्ग काढला.
अशा पद्धतीने मोठमोठी पर्वते आणि जंगल पार करीत मी शेवटी मैदानी प्रदेशात येऊन पोहचले. मी जेथून जेथून वाहू लागले त्या त्या ठिकाणी माझ्या दोन्ही बाजूंना तट बनवण्यात आले. दिवसेंदिवस माझा विस्तार होत होता. हळू हळू माझ्या तटावर वस्तू बसू लागली. अनेक लोक आपापली घरे आणि झोपड्या माझ्या किनाऱ्यावर बनवू लागले. आज मी ज्या ज्या ठिकाणांहून वाहते तेथे अनेक लहान मोठी गावे आहेत. हे सर्व लोक माझ्या पाण्यावर अवलंबून असतात. शेती आणि पिण्यासाठी ते माझे पाणी वापरतात. लोकांनी आपल्या सुविधेसाठी माझ्या वरून अनेक लहान मोठे पुल बनवले आहेत. या पुलावरून गाड्या मोटारी वाहतूक करीत असतात.
बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी मुळे माझे पाणी वाढते. मला महापूर येतो अश्या वेळी पुल तसेच अनेक लहान मोठ्या गावांमध्ये पाणी शिरते. या पाण्यामुळे लोकांनी त्रास होतो. परंतु मी देखील काय करू शकते माझा प्रवाह माझ्या ताब्यात थोडीच असतो. मी माझ्या जीवन काळात अनेक गावं आणि शहरांमधून वाहिले आहे. अनेक सैनिक, राजे महाराजे, डाकू आणि साधू संतांना मी पाहिले आहे. जुनी घरे नष्ट होताना आणि नवीन वस्ती स्थापित होतांना मी पाहिली आहे.
मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. अनेक संकटे व दुःखाचा मी सामना केला आहे. तुम्हा सर्वांना माझा सल्ला आहे की तुम्ही देखील संकटाना घाबरता व धीर न सोडता सामोरे जा आणि आपल्या आयुष्यात हवे ते प्राप्त करा.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Source: Internet
Post a Comment