मला पंख असते तर
मोकळ्या आकाशाला पाहून एक प्रश्न मनात येतो की जर मला पंख राहिले असते तर काय झाले असते? किती मजा आली असती मी इतरांपेक्षा वेगळा राहिलो असतो. माझे पंख कधीही थांबले नसते. जिथे मला जायचे आहे त्या ठिकाणी मला उडवून घेऊन गेले असते. शाळेत जायला मला बस ची वाट पाहावी लागली नसती, उडत उडत मी तेव्हाच शाळेत पोहोचलो असतो. पक्षी ज्या पद्धतीने हवेला कापत उडतात त्याच पद्धतीने मी आनंदाने हवेला कापले असते.
पंखामुळे मला विमानाची मोफत सैर मिळाली असती. वेगवेगळ्या देशाबद्दल माहिती वाचून मी त्या देशांमध्ये मुक्काम ठोकला असता. पंखांच्या मदतीने मी शहराच्या उंच जाऊन सुंदर दृश्य पाहली असती. शहराची ही दृश्य मोबाइल मध्ये टिपून मित्रांना दाखवली असती. पंखांनी मी माझ्या आईला दररोज कुठ न कुठ फिरवायला नेले असते. माझ्या मित्रांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून पंखांची एक सैर दिली असती. थंड हवेमध्ये माझी सैर झाली असती. पंखाच्या मदतीने मी कापसासारख्या मऊ मऊ ढगांमध्ये हात पुरवला असता.
पंख असल्याने मी एखाद्या सुपर हीरो सारखा राहीलो असतो. शहरातील चोर डाकूना पकडण्यासाठी मी उंच उडून त्यांचा पत्ता लावला असतं. पंखामुळे मला संपूर्ण जग वरून पाहता आले असते सुंदर दृश्य मी माझ्या डोळ्यामध्ये भरले असते. पाऊस कुठून येते हे पाण्यासाठी मी वर गेलो असतो. पळापळी च्या खेळात मला कोणीही हरवू शकले नसते. पंखांमुळे मला निसर्गाबद्दल अधिकाधिक माहिती कळली असती. मी उडत उडत उंच उंच पर्वत आणि खोल दऱ्यांची सैर केली असती. उडत उडत समुद्राच्या अंत काय आहे ते पाहण्यासाठी गेलो असतो.
पंख असण्याची कल्पना खूप सुखद आहे. परंतु परमेश्वराने पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याची रचना वेगवेगळी केली आहे. मनुष्याला पंख जारी नसले तरी त्याला बुद्धी मिळाली आहे. ज्या बुद्धी च्या बळावर तो काहीही करू शकतो. जरी आज माझ्याकडे शारीरिक पंख नसले तरी माझे ज्ञान माझी आवड माझे पंख आहेत. कारण आजच्या जगात ज्ञानाने कोणताही व्यक्ती उंच उडू शकतो. ज्याचा कडे ज्ञान रुपी पंख आहेत असा व्यक्ती कुटुंब, समाज व देशाचे कल्याण करतो. म्हणून वेळोवेळी नवनवीन पुस्तके व माहिती वाचून मी माझे ज्ञानरूपी पंख मोठे करीत राहील.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Source: Internet
Post a Comment