पुस्तकाची आत्मकथा

 पुस्तकाची आत्मकथा  

पुस्तकाची आत्मकथा

मी एक पुस्तक आहे, ज्या रूपात मी आज दिसत आहे आधीच्या काळात मी असा नव्हतो. गुरुद्वारे शिष्यानां मौखिक ज्ञान दिले जायचे व गुरु शिष्य परंपरेने ज्ञान एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात होते. त्या काळात कागदाचा शोध लागला नव्हता. 


या पद्धतीत हळू हळू अवघडपणा येऊ लागला. ज्ञानाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला कुठे तरी लिहून ठेवणे आवश्यक होते. तेव्हा प्राचीन ऋषी मुनींनी भोजपत्रावर लिहिणे सुरू केले. भोजपत्र कागदाचे प्रथम रूप होते. भोजपत्र आजच्या काळातही पाहायला मिळतात. आपल्या देशातील अतिप्राचीन साहित्य भोजपत्रांवरच लिहिले आहे. आशा पद्धतीने प्राचीन काळातील माझे रूप होते.


माझे कागदी रूप निर्माण करण्यासाठी गवत, लाकडाचे तुकडे, जुने कपडे इत्यादी गोष्टींना मिक्स करून बनवले जाते. लेखक त्याने लिहिलेली माहिती घेऊन येतो व यानंतर ती माहिती माझ्यावर छापली जाते. या साठी छापखण्यातील मशीन वापरले जातात. छापखण्यात तयार झाल्यावर माझ्या सर्व पेजेसला डिंक आणि पिना मारून जोडले जाते व अश्या पद्धतीने मी तयार होतो.


या नंतर प्रकाशक मला त्याच्या कार्यालयात घेऊन जातो तेथे माझे प्रकाशन केले जाते. प्रकाशित केल्यानंतर मला विक्रेत्याच्या हाती विकले जाते. विक्रेते आपल्या दुकानात मला विकायला ठेवतात. या शिवाय वेगवेगळ्या वाचनालयात मला पाठवले जाते. वाचनालयात दिवसभरातून भरपूर लोक मला वाचायला येतात. सध्याच्या काळात माझी मागणी खूप आहे. मला मोठं मोठ्या पुस्तकालय मध्ये सांभाळून ठेवले जाते. मला विद्याची देवी सरस्वती चे स्थान दिले जाते. ज्यांचा छंद वाचनाची आवड असतो असे सर्वजण माझे घट्ट मित्र बनतात. मी सुद्धा त्यांना ज्ञान देऊन त्याचा अंधकार दूर करतो. 


जर कोणी माझी निगा न राखता मला फाडले तर मला ते आवडत नाही. बरेच लोक मला रद्दी मध्ये टाकून देतात. भाजीपाला तसेच किराणा दुकानदार मला फाडून टाकतात. माझी इच्छा आहे की मला सम्मानाने ठेवायला हवे जर तुम्ही मला वाचून संपवले असेल तर दुसरे कोणाला देऊन टाका पण माझा वापर आदराने करा. कितीतरी लोक परिश्रम करून मला तुमच्या पर्यंत पोचवतात.


या शिवाय आजकाल अनेक लोक वाचनासाठी मोबाइल चा उपयोग करतात. मोबाइल चे फायदे आणि तोटे  मध्ये आहेत तासन्तास मोबाइल मध्ये वाचन केल्याने डोळ्यांना त्रास निर्माण होतो. शेवटी मला अशा आहे की तुम्ही माझ्या डिजिटल रुपाचे वाचन न करता माझ्या भौतिक रुपाचाच उपयोग करणार  व मला नेहमी सन्मानाने ठेवणार. धन्यवाद

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Source: Internet


Post a Comment

Previous Post Next Post