मातीच्या (स्लॅबवर)ठोकळ्यावर उठाव शिल्प तयार करणे
मातीच्या (स्लॅबवर)ठोकळ्यावर उठाव शिल्प तयार करणे
साहित्य व साधने : शाडूमाती, पाणी, गोणपाट, लाकडी पाट,रद्दी कागद इत्यादी.
कृती -
१) शाडू माती स्वच्छ करा. त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून माती मऊ होईल अशी मळून घ्या.
२) ओली व मऊ माती घेऊन ती लाकडी पाटावर थापा.त्यापासून चौरसाकृती आकारात दोन ते तीन सेमी जाडीचा मातीचा सपाट स्लॅब (ढोकळा) तयार करून घ्या.
३) शिल्प तयार करण्यासाठी आपण द्राक्षाचा घड निवडू या. मऊ मातीपासून लंबगोल अशी छोटी द्राक्षे तयार करा.
४) त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे द्राक्षांच्या वेलीची दोन पाने तयार करा.
५) तयार केलेले द्राक्षांचे आकार मातीच्या सपाट ढोकळ्यावर एक एक दाबून बसवा. आवश्यक तेथे हे आकार एकमेकांवर येतील असे लावा. घडाच्या वरच्या बाजूला पाने लावा.
६) मातीचा स्लॅब व त्यावर लावलेले मातीचे आकार हे एकसंध करून घ्या. त्याकरिता आवश्यक तेथे ओल्या मातीचा किंवा पाण्याचा वापर करा.अशा तऱ्हेने द्राक्षाच्या घडाचे उठाव शिल्प तयार होईल.
७) प्राणी,पक्षी,वनस्पती,फळे, मानवाकृती खेळणी यांच्या आकाराप्रमाणे गोलाकार चौकोनी लंबा कृती लांबट चपटे मातीच्या वड्या असे आकार तयार करून उठाव शिल्पे तयार करू शकता.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment