शिष्यवृत्ती सराव ८ वी गणित
टेस्ट ७ संख्यारेषा
गणित -संख्यारेषा
➤ जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात, तेव्हा त्या रेषेला संख्यारेषा म्हणतात. संख्यारेषेवरील 0 (शून्य) ही संख्या
0 या बिंदूने दर्शवतात. या बिदूला आरंभबिंदू म्हणतात.
➤ आरंभबिंदूच्या उजवीकडील संख्या धन असतात व डावीकडील संख्या ऋण असतात. संख्यारेषेवर सर्व परिमेय संख्या दाखवता येतात (लक्षात ठेवा की नैसमगिक संख्या, पूर्ण संख्या व पूर्णांक संख्या या परिमेय संख्याच आहेत.)
➤ संख्यारेषेवरील संख्या डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने व उजवीकडून डावीकडे उतरत्या क्रमाने लिहिलेल्या असतात.
➤ संख्यारेषेच्या साहाय्याने दोन परिमेय संख्यांमधील लहान-मोठेपणा ठरवता येतो. तसेच जेव्हा दोन परिमेय
संख्यांचे छेद समान नसतात, तेव्हा छेद समान करून त्याच्यातील लहान-मोठेपणा ठरवता येतो.
Post a Comment