विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान आजच्या युगात फार महत्वाचे आहे . शालेय अभ्यासक्रमाबरोबर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी इयत्ता १ ली ते पुढील सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे . यामुळेच आपण एक उपक्रम हाती घेतला आहे - चला गुणवंत होऊया यामध्ये दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे दिली जाणार ! आपण ती व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून घ्या व वाचा .
आठवड्यातून एक Online test घेतली जाणार , यामुळे किती प्रश्न आपल्याला समजले ते लक्षात येईल .चला तर मग सुरुवात करूया, गुणवंत होण्याची तयारी करूया .
सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. १
प्रश्न १ - संत नामदेव यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - नरसी
प्रश्न २ - संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - आपेगाव
प्रश्न ३ - संत तुकाराम यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - देहू
प्रश्न ४ - संत एकनाथ यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - पैठण
प्रश्न ५ - संत जनाबाई यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर - गंगाखेड
Post a Comment