माझे आवडते फळ

 माझे आवडते फळ  

परमेश्वराने आपला खजाना निसर्गाच्या रूपाने मनुष्याला दिला आहे. उंच पर्वत, नद्या, सूर्य, चंद्र, तारे, बर्फ इत्यादी अनेक गोष्टी निसर्गाकडून आपल्याला मिळालेल्या आहेत. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये येणारी फळे आणि फुलेही निसर्गाचीच भेट आहेत. या स्वादिष्ट फळांचा आस्वाद घ्यायला प्रत्येकालाच आवडते. असेच एक सुगंधित आणि स्वादिष्ट फळ आंबा आहे. आंबा माझे आवडते फळ आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आढळतात. परंतु सर्वच आंब्यांचा स्वाद जवळपास सारखाच.


आंबा फळांचा राजा असण्यासोबतच भारताचे राष्ट्रीय फळ देखील आहे. भारतात आंब्याच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. आंबा खूपच स्वादिष्ट फळ आहे. याचा स्वाद गोड तसेच खट्टा मीठा असतो. उन्हाळ्याच्या काळात भारतीय लोक आंब्याची आतुरतेने वाट पाहतात. आंबा हा उन्हाळ्यातच येतो. आंब्याचा रस जगातील सर्वात प्रसिद्ध रस आहे. आंबा विटामिन ए, सी आणि डी ने परिपूर्ण असतो. म्हणून आंबा खाल्ल्याने विटामिन च्या कमतरतेमुळे होणारे रोग कमी होतात. 


आंब्यापासून लोणचे, मुरब्बा व जाम बनवले जाते. लहान मुलांना आंबा खायला खूप आवडते. विशेषता कच्चे आंबे. कच्या आंब्याला आंब्याची कैरी म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांना ही कैरी खायला खूप आवडते. ज्याप्रमाणे आंबा भारतीयांना स्वाद देत आहे त्याच पद्धतीने आता विदेशी मुद्रा कमावण्यात आंबा देशाला सहाय्य करीत आहे. इतर देशांमध्ये आंब्याची निर्यात केल्याने भारताला मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा प्राप्त होत आहेत. 


आंब्याचे नियमित सेवन शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवते. परंतु आंब्याचे अति प्रमाणात सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते. आंबा स्वभावाने गरम असतो. याला काही वेळ पाण्यात ठेवून थंड झाल्यावरच खायला हवे. माझे वडील दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंबे आणतात. मला आंबे खायला खूप आवडतं व माझे आवडते फळ आंबा आहे.

स्त्रोत : इंटरनेट 

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post