अलंकारांचे प्रकार
ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते , भाषा सुंदर व आकर्षक होते , त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात .
मराठी अलंकारांचे प्रकार :
शब्दालंकार
अर्थालंकार
शब्दालंकार
अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शद्बरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात
शब्दालंकाराचे प्रकार
यमक अलंकार
कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे
वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो.
उदाहरण
माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल
अनुप्रास अलंकार
एख्यादा वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो
उदाहरण
पर्वताच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला
श्लेष अलंकार
एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदाहरण
सुनील : काय करतोस
आनिल : काय नाही, पडलोय
सुनील : पडलास ? लागलं का मग ?
श्लेष म्हणजे आलिंगन किंवा मिठी एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतातû त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.
अर्थालंकार
अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गदáयरचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात येते की, आपल्याला जे सांगावयाचे आहे, ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्याच्यासाऱ्यांचे च दुस-या गोष्टीची आपण मदत घेतो, त्याची तुलना करतो
अर्थालंकाराच्या द्रुष्टीने पुढील संकल्पना महत्वाच्या आहेत :
अ) उपमेय : ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे, तो घट
ब) उमपान : ज्याच्याशी तुलना करावयाची आहे, किंवा ज्याची उपमा दिली जाते, तो घटक
क) साधारणधर्म : दोन वस्तूंत असणारा सारखे पणा किंवा दोन वस्तूंतील समान गुणधर्म
ड) साम्यवाचक शब्द : वरील सारखे पणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द
अर्थालंकाराचे प्रकार
उपमा अलंकार
दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे दाखविलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुस-यासारखी आहे असे वर्णन असते
उदाहरण
1) मुंबईची घरे मात्र लहान…. कबुतराच्या खुराड्यासारखी ….
2) सावळाच रंग तुझा पावसळि नभापरी
3) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे
सामान्यत: उपमा अलंकारात सारखा , जसा, जेवि, सम, सदðश, गत, परी, समान
यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
उत्प्रेक्षा अलंकार
उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना, ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो, त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे, अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात.
उदाहरण
1) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ….
2) किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची किती बाकदार ।
शिरोभागी तांबडा तुरा हाले । जणू जास्वंदी फुल उमललेले ।।
अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार ।।
रूपक अलंकार
उपमेय व उपमान यांच्यात एकरुपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते, तेथे रूपक हा अलंकार असतो.
उदाहरण
1) बाई काय सांगो । स्वामीची ती द्रुष्टी ।
अमृताची द्रुष्टी । मज होय ।।(स्वामींची द्रुष्टी व अमृताची द्रुष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहेत.)
अनन्वय अलंकार
उपमेय हे केव्हा केव्हा एख्याद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्दीवतीये असते की त्याला योग्य
असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते.
उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देत येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच
उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे तुलना. अनन्वय म्हणजे तुलना नसणे.
ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, तो अनन्वय.
उदाहरण
1) झाले बहु… होतिल बहु… आहेतहि बहु… परि यासम हा
2) आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
3) कर्णासारखा दानशूर कर्णच….
अपन्हुती अलंकार
अपन्हुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे उपमान हे उपमेयाचा निषेध करन ते उपमानच आहे
असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा अपन्हुती अलंकार होतो.
उदाहरण
1) न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजतिल ।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।
2) ओठ कशाचे… देठचि फुलल्या परिजातकाचे
3) मानेला उचलितो, बाळ मानेला उचलितो ।
नाही ग बाई, फणा काढुनि नाग हा डोलतो ।।
Post a Comment