माझा आवडता प्राणी बैल

 माझा आवडता प्राणी बैल 

माझा आवडता प्राणी बैल

आपल्या देशात लोक अनेक पाळीव प्राणी पाळता. कुत्रा, मांजर या सारखे प्राणी जास्त करून श्रीमंत लोक आपली हौस म्हणून पाळतात. पण गरीब शेतकऱ्याला गाई व बैलच पाळावे लागतात. कारण गाई म्हशी शेतकऱ्याला दूध देतात आणि बैल शेताच्या कामी येतो. बैल हा सर्वात जास्त प्रमाणात कष्ट करणारा प्राणी आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्रच असतो. मला बैल खूप आवडतो आमच्या घरी सुद्धा 1 बैल जोडी आहे.


बैल खूपच कष्टाळू असतो. त्याचे लांब व मजबूत पायंच्या मदतीने तो शेत नांगरण्यात खूप मदत करतो. बैलाचे शरीर पण खूप मजबूत असते. बऱ्याचदा शेतकरी त्याच्या अंगावर समान वाहतो. यासाठी बैलाला बैलगाडी ला बांधले जाते. बैल हा पूर्णपणे शाकाहारी असतो तो फक्त हिरवा चारा खातो. मासाहर न करता ही बैल इतर सर्व प्राण्याच्या तुलनेत अधिक कष्ट करण्याची क्षमता ठेवतो. 


भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बैलाच्या प्रजाती पाहायला मिळून जातात. भारता ऐवजी विदेशात देखील बैल पाळले जातात. आपल्या महाराष्ट्रात बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते. हा दिवस बैलांचे आभार मानण्यासाठी असतो. वर्षभरातुन एकदा या दिवशी बैलाला आराम दिला जातो, पुराण पोळी सारखे स्वादिष्ट व्यंजन बनून त्यांला खाऊ घातले जातात. 


खरोखर बैल हाच शेतकऱ्याचा खरा मित्र असतो. तो आपल्या मालकाच्या भावना बरोबर ओळखतो. या मुळेच मला बैल खूपच प्रिय आहे व माझा आवडता प्राणी बैल आहे.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Source: Internet

Post a Comment

Previous Post Next Post