झाडे लावा झाडे जगवा
मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा. आज झाडे वाचवा झाडे जगवा हि गोष्ट यासाठी करावी लागत आहे कारण मनुष्य अन्य नैसर्गिक संसाधनाप्रमाणेच झाडांनाही नष्ट करत आहे. सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. जगभरात वाढत्या लोकसंख्या मुळे अन्नपाणी राहण्यासाठी घरे आणि जागेची मागणी वाढीत आहे. ज्यामुळे जगभरात अंधाधुंद वृक्षतोड सुरू आहे.
झाडेझुडपे ही समाजाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतात. आपल्या आसपासचा परिसर जसे गल्ल्या, मैदाने, बाग-बगीचे इत्यादी ठिकाणी झाडे स्वच्छ हवा देण्याचे काम करतात. वातावरणाला हिरवे आणि शांत ठेवण्यात ते मदत करतात. झाडे कार्बन डाय-ऑक्साइड वायूला वातावरणातून शोषून घेतात, व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. हाच ऑक्सिजन मनुष्याला श्वासोश्वास करण्यासाठी महत्त्वाचा असतो.
आपल्या देशात झाडांची पूजा केली जाते त्यांना देवाचे स्थान दिले जाते. वड, पिंपळ यासारखे झाडांना आपल्या देशात पूजले जाते. परंतु आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक ठिकाणी शहरीकरण होत आहे. ज्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. याशिवाय आजसुद्धा बऱ्याच घरात अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो.
पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवण्यासाठी झाडांना वाचवणे खूप आवश्यक आहे. शहरी भागात झाडांच्या कमी मुळे गाड्यांमधून निघणारा धूर आकाशात राहून जातो ज्यामुळे श्र्वासोश्वासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. जर अश्याच पद्धतीने वृक्षतोड सुरू राहिली तर लवकरच वृक्षांत सोबत मनुष्यजातीचा देखील अंत होईल. म्हणून आपण वृक्षतोड करायला नको व जर कोणी वृक्षतोड करीत असेल तर त्याला सुद्धा थांबायला हवे. जास्तीत जास्त लोकांमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोहोचवायला हवा.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Source: Internet
Post a Comment