आरसा नसता तर
आज प्रत्येक क्षेत्रात आरस्याचा वापर केला जातो. आरसा हा दैनंदिन जीवनात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल प्रत्येक घराघरात आरसा असतो. आरसे लहान मोठ्या आकारात असतात, काही आरसे येवढे लहान असतात की त्यांना आपल्या पर्स मध्येही ठेवता येते तर काही ठिकाणी उंच इमारतींवर विशाल आरसे देखील लावलेले असतात.
आपल्या दैनंदिन जीवन शैलीत आपण अनेक अश्या जीवनावश्यक गोष्टींचा वापर करीत असतो ज्यांच्या शिवाय सुगम जीवन शक्य नाही. परंतु लहानपणापासून या गोष्टी आपल्या सभोवताली असल्याकारणाने त्यांचे महत्त्व आपल्याला कळत नाही. अश्याच या उपयोगी गोष्टींपैकी एक आहे आरसा. आरश्याला इंग्रजी भाषेत मिरर आणि हिंदी भाषेत शिषा म्हटले जाते.
घरातून बाहेर पडणारा प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष प्रत्येक जन एकदा तरी आरश्यात आपला चेहरा पाहतो. कॉलेजात शिकणाऱ्या तसेच नोकरी करणाऱ्या मुलींच्या पर्समध्ये आरसा असतोच. मोटारसायकल वरून जाणारा युवकही बाईकच्या आरश्यात स्वताला पाहायला विसरत नाही. शेवटी सांगायचा अर्थ एवढाच आहे की आपण आरश्याशिवाय अपूर्ण आहोत. पण तुम्ही कधी विचार केलाय की जर आरसाच नसता तर...? काय झाले असते बर.
आरसा नसता तर मनुष्याची मोठी गैरसोय झाली असती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो स्वतःचे रंग रूप जाणू शकला नसता. एखादी मुलाखत किंवा लग्न समारंभात जातांना नटता आले नसते. आपण कसे दिसत आहोत म्हणून पुन्हा पुन्हा दुसऱ्याला विचारावे लागले असते. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण वाटले असते. फोटो स्टुडिओ तसेच केस कापण्यासाठी पार्लर मध्ये गेले की आरसे अतीआवश्यक असतात. आज जगभरात आरश्या मुळे अनेक शोध लागले आहेत. भौतिकशास्त्रातील प्रकाशाचे नियम आरश्यामुळेचे समजता आले आहेत. अनेक शास्त्रज्ञ आपल्या अभ्यासात आरश्याला महत्त्वाचे स्थान देतात. या शिवाय जर आरसा नसता तर गाडी चालवीत असतांनाही मोठी गैरसोय झाली असती. मागून काय येतेय ये पाहण्यासाठी मागे मान वळवावी लागली असती. अश्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढले असते.
आरसा नसण्याचे अनेक नुकसान आपल्याला झाले असते. परंतु काही लोकांसाठी हे फायद्याचे ठरले असते. जे लोक दिसण्यात कुरूप आहेत किंवा ज्यांचा चेहरा काही कारणास्तव खराब झालेला आहे अश्या लोकांना याचा फायदा झाला असतात. आपला चेहरा कसा दिसतो हे माहीत नसल्याने, इतरांपेक्षा कमी असण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली नसती.
परंतु काहीही असो आरसा नसण्याचा फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहेत. म्हणून आरसा जर नसता तर मनुष्य जीवनही विस्कटलेले राहिले असते. आरसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंगच आहे. परंतु आपण मनुष्याने जर पुन्हा पुन्हा स्वताला आरश्यात पाहून नटण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष दिले तर बरे होईल.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Source: Internet
Post a Comment