रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे

रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे 

रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे

रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे

साहित्य व साधने: लहान मोठ्या आकारांची पुठ्ठ्याची रिकामी खोकी, रंगीत कागद, झाडू च्या काड्या, बाटल्यांची बुचे, रंग ,ब्रश, कात्री, गोंद इत्यादी.

कृती -

१)लहान मोठ्या आकाराची पुठ्ठ्याची रिकामी खोकी घेऊन त्यांची चित्र (१)प्रमाणे रचना करून घ्या.


२)खोक्याच्या पुढील पृष्ठ भागावर दारे व खिडक्याचे चित्र काढा किंवा इंग्लिश आय आकार काढून, त्यावर कात्रीने कापून दारे- खिडक्या तयार करा .छपराच्या ठिकाणी पुठ्ठा त्रिकोणात दुमडून चिटकवा.


३)खोके एकमेकांवर ठरवलेल्या रचनेप्रमाणे चिटकवून घ्या .आवडीनुसार रंगीत कागद चिटकवून घराची सजावट करा.


४)लाल कागदाच्या पट्ट्या (१.५सेमी रुंदी ,)घेऊन त्यावर आकृती काढून ,कापून घराच्या प्रतिकृतीला छपराच्या ठिकाणी चिटकवलेल्या पुठ्ठावर चिटकवून घ्या किंवा झाडू च्या काड्या योग्य प्रमाणात कापुण चिटकवा.


५)तयार घराची प्रतिकृती मोठ्या खोक्याच्या पुठ्ठ्यावर चिकटवून घ्या.


६)घराच्या आजूबाजूला पुठ्ठा व कागदापासून कुंपण,गवत ,झाडे ,तयार करून चिटकवून घ्या . 

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post