नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा - 13 भाषा उतारा वाचन

 नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा -

 13 भाषा

उतारा वाचन

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.

           डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे दहा फूट असते.त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैलअसतो. काही वेळा तर ते ताशी ४० ते ६० मैल वेगाने पोहतात.
        डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे.माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते.
           डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्यानेहसू शकतो; ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो 'म्याऊ' असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो.
          डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनिलहरींनी संपर्क साधतात.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post