नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा -
14 भाषा
उतारा वाचन
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रियांका सुट्टीनिमित्त आई व अमित सोबत मामाच्या गावी गेली. एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व अमित सोबत नदीवर गेली असताना काठावर खेळणारा अमित पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला. आई घाबरून गेली. प्रियांकाने प्रसंगावधान राखून, धुण्यातील एक साडी घेतली. साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले. अमितने ते टोक पकडले.प्रियांकाने साडी हळूहळू ओढून अमितचे प्राण वाचवले.प्रियांकाच्या धाडसाची दखल घेऊन तिला 'बालशौर्य पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले .
Post a Comment