नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा -
15 भाषा
उतारा वाचन
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
चघळायचा डिंक (च्यूइंग गम) हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्यांना सॅपोडिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला. तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते चिकल म्हणू लागले. तो चघळायला छान लागत असे. आजही चिकलेरो नावाचे लोक चिकल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिकल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्यात गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात.
Post a Comment