माझा आवडता विषय गणित निबंध

 माझा आवडता विषय गणित  निबंध

जेव्हा मी इयत्ता दहावीत आलो तेव्हा घरातील सर्वांनी मला चांगले मार्क पाडून उत्तीर्ण व्हायला सांगितले. मला माहित होते की गणितात मला चांगले मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून मी गणितासोबत इतर विषयांची तयारीही करू लागलो. माझे स्वप्न लहानपणापासूनच एक गणितज्ञ बनण्याचे आहे. कारण माझा आवडता विषय गणित आहे. गणितातील उदाहरणे सोडवणे मला खूप आवडते.


मी गणितातील सर्व महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवले आहे. या सूत्रांचा गणित उदाहरणे सोडविताना खूप उपयोग होतो. माझे बरेच मित्र गणिताचा अभ्यास करण्यासाठी माझ्या घरी येतात. कारण त्यांनाही माहित आहे की गणित विषयातील उदाहरणे सोडवण्यात मला जराही अडचण येत नाही. गणितात चांगला असल्याने मला इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळून जातो.


प्रत्येक परीक्षेत मला गणित विषयात उच्च गुण मिळतात. यामुळे आमचे गणिताचे शिक्षक खूप खुश होतात. सरांनी बऱ्याचदा इतर मुलांसमोर माझी प्रशंसा केली आहे. माझे स्वप्न आहे की मी मोठा होऊन एक गणितज्ञ बनेल. मी स्वतःला तेव्हाच यशस्वी मानेल जेव्हा माझ्या मुळे माझे कुटुंब व शाळेचे नाव जगभरात पसरेल. 


बऱ्याचदा माझ्या शेजारी असणारे मुले माझ्याकडे गणित शिकायला येतात मला त्यांना गणित समजावण्यात खूप आनंद होतो. मी संपूर्ण चित्त लाऊन त्यांना गणित शिकवतो. माझे आईवडील माझ्या या कार्यामुळे खूप आनंदी होतात. मी गणितज्ञ आर्यभट्ट यांच्याबद्दलची पुस्तके वाचत असतो. मी भविष्यात आणखी परिश्रम करून गणित विषयात जास्तीत जास्त यश प्राप्त करेल.

स्त्रोत : इंटरनेट

मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा 

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

أحدث أقدم