माझा आवडता मित्र
माझे नाव सुरेश आहे आणि मी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सातारा येथील विद्यार्थी आहे. मी सातव्या इयत्तेत शिकत आहे. तसे पाहता माझ्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत पण या सर्वामध्ये विजय माझा आवडता मित्र आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. विजय हुशार विद्यार्थी आहे, तो खूप मेहनती पण आहे. असे म्हणतात की ज्याचे मित्र नाही राहत तो खूपच दुर्भग्याशाली असतो. आजच्या या जगात खरा मित्र मिळणे फारच कठीण आहे. पण या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे कारण माझ्याकडे विजय सारखा खरा, इमानदार आणि मेहनती मित्र आहे.
विजय च्या कुटुंबातील सदस्य पण स्वभावाने अतिशय चांगले आहेत. त्याचा वडिलांचे इलेक्ट्रिक वस्तूचे शोरूम आहे. त्याची आई घरकाम करते. विजय च्या घरी माझे येणे जाणे कायम सुरू असते. त्याचे आईवडील सुद्धा मला माझ्या आईवडीलांसारखेच प्रेम करतात. कोणतीही समस्या असो विजय कायम माझ्या मदतीला उभा असतो. वर्गात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्याची प्रशंसा करतात. एका चांगल्या मित्राचे सर्व गुण त्यांच्यात आहेत. शाळेत येताना विजय नेहमी स्वच्छ गणवेश घालून येतो. तो नियमित शाळेत येतो आणि शिक्षकाची आज्ञा पाळतो.
या शिवाय विजय वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पण करतो. जरी त्याचे वडील श्रीमत् आहेत तरी विजय ला या श्रीमंतीचा जरा सुद्धा अभिमान नाही. विजय ने बऱ्याचदा आपल्या वडिलांना सांगून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची फी, पुस्तके, गणवेश इत्यादी गोष्टींची व्यवस्था करून दिली आहे. विजय च्या स्वभवाबरोबर त्याचे विचार पण खूप चांगले आहेत. तो कधीही आपला वेळ वाया घालवत नाही. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो सहभाग घेतो. विजय ला क्रिकेट खेळायला खूप आवडते. म्हणून आम्ही रोज संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो.
असे म्हणतात की ज्याचे मित्र नाही तो खूप दुखी असतो. पण कपटी मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा. खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात आणि आपला आनंद वाढवतात. खरे मित्र बनवावे लागत नाही ते आपोआप स्वभावाने बनून जातात. अश्या मित्रासोबत मित्रता दिवसेदिवस वाढत जाते. अश्याच मित्रांपैकी एक आहे विजय . विजय हा माझा खरा मित्र आहे आणि माझी देवाला प्रार्थना आहे की आमची मैत्री कायम टिकून राहो.
स्त्रोत : इंटरनेट
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
إرسال تعليق