माझा आवडता खेळ फुटबॉल

 माझा आवडता खेळ फुटबॉल 

माझा आवडता खेळ फुटबॉल


खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. पण या सर्वात माझा आवडता खेळ फुटबॉल हा आहे. फुटबॉल ला जगातील सर्वात मनोरंजक खेळामधून एक मानले जाते. हा खेळ विविध देशातील युवकाद्वारे मोठ्या आवडीने खेळला जातो. फुटबॉल व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक रूपाने मजबूत बनवतो. पूर्वीच्या काळी हा खेळ फक्त पश्चिमी देशाद्वारे खेळला जायचा. नंतरच्या काळात हा पूर्ण जगात पसरत गेला.


फुटबॉल खेळाच्या उत्पत्ति बद्दल म्हटले जाते की हा खेळ चीनी खेळ सुजू सारखा आहे, व सुजू पासूनच फुटबॉल विकसित झाला. पूर्वी जपान मध्ये असुका वंशाचे लोक फुटबॉल खेळत असत. या नंतर या खेळाचा विस्तार जगभरातील वेगवेगळ्या देशात झाला. भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव 'नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी' आहे. त्यांना 'भारतीय फुटबॉल चे जनक' म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.


फुटबॉल खेळण्यासाठी वापरला जाणारा बॉल मजबूत रबर पासून बनवला जातो. यात टाईट हवा भरलेली असते. फुटबॉल खेळत असतांना खेळाडूला आपले संपूर्ण लक्ष चेंडूवर ठेवावे लागते. हा खेळ दोन संघाद्वारे खेळला जातो. प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असतात. फुटबॉल चे मैदान आयाताकृती असते. दोघी बाजूंना नेट ने बनवलेले गोल पोस्ट असते. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोल पोस्ट मध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असतात. या खेळाचे काही नियम पण असतात. जसे यात फूट बॉल ला हात लावण्याची परवानगी नसते, ठराविक अंतरावरून गोल करावे लागते. हा खेळ 90 मिनिटाचा असतो. 


आज आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचेस सुद्धा आयोजित केल्या जातात. हा खेळ मनोरंजन, आनंद व शरीराचा व्यायाम व्हावा या हेतूने खेळला जातो. फुटबॉल खेळल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या खेळात लगातार पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा चांगलाच व्यायाम होतो. अन्न पचन लवकर होते व भूक पण चांगली लागते. मी माझ्या मित्रांसोबत शाळेत दररोज फुटबॉल खेळतो. फुटबॉल मुळे माझे शरीर मजबूत झाले आहे. व माझी रोगप्रतिकार शक्ति वाढली आहे. 


फुटबॉल जगभरात लोकप्रिय आहे. परंतु आजकाल फुटबॉल च्या बऱ्याच सामन्यामध्ये मॅच फिक्सिंग केली जाते, असे करणे योग्य नाही. खेळाला शारीरिक लाभ, सहयोग आणि शिस्ती च्या भावनेने खेळायला हवे. या खेळात एक संघ हरतो व एक जिंकतो परंतु या हार जीत मुळे प्रेम कमी न होता वाढतेच.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Source: Internet

Post a Comment

أحدث أقدم