माझा आवडता खेळ बॅडमिंटन

 माझा आवडता खेळ बॅडमिंटन

माझा आवडता खेळ बॅडमिंटन

माझा आवडता खेळ बॅडमिंटन चा खेळ आहे. दररोज संध्याकाळी मी माझ्या मित्रांसोबत बॅडमिंटन चा हा खेळ खेळतो. बॅडमिंटन खेळण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसल्याने आम्ही आमची घराच्या कंपाऊंड मध्ये खेळतो. याशिवाय शाळेतही शारीरिक शिक्षण च्या तासाला आम्ही बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटन खेळण्यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता नसते. मी या खेळातील कुशल खेळाडू आहे. माझे बॅडमिंटन मधील कौशल्य पाहून सर्वजण माझे कौतुक करतात. 


बॅडमिंटन हा चार भिंतीच्या आत खेळला जाणारा खेळ आहे. ह्या खेळाला बंद खोलीत या साठी खेळले जाते कारण खेळामध्ये जे शटलकॉक वापरले जाते, ते खूप हलके असते व हवेच्या वेगाने ते इकडे तिकडे वळू शकते. पण आपण याला मोकळ्या मैदानात पण खेळू शकतात. बॅडमिंटन माझा आवडता खेळ आहे याला खेळण्यात खूप मजा येते. याला खेळल्याने शरीरात रक्तस्त्राव व्यवस्थित होतो. ज्या मुळे हृदय संबंधी रोग दूर होतात. 


बॅडमिंटन खेळण्यासाठी 2 खेळाडूची आवश्यकता असते, या सोबतच दोन रॅकेट आणि एक शटलकॉक पण लागतात. दोघी बाजूंना समान मैदान दिले जाते, मध्ये एक जाळी नेट म्हणून बसविण्यात येते. रॅकेट च्या मदतीने शटलकॉक ला इकडून तिकडे मारले जाते. ज्याच्या मैदानात शटलकॉक पडले त्याची हार होते. बॅडमिंटन माझा आवडता खेळ आहे. याला खेळायला जास्त जागा लागत नाही व यात दुखापत होण्याची शक्यता पण कमीच असते. बॅडमिंटन खेळल्याने माझे शरीर तंदुरुस्त झाले आहे. आभ्यासात सुद्धा एकग्रता वाढत आहे. माझे मानने आहे की सर्वांनीच बॅडमिंटन खेळायला हवे. बॅडमिंटन खेळण्यासाठी लागणारे साहित्य गाव व शहर दोघी ठिकाणी कमी किमतीत उपलब्ध आहे. 


आजकाल बॅडमिंटन भारतात खूप लोकप्रिय होत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला वर्गात पी व्ही सिंधू यांनी  2016 साली सिल्व्हर मेडल मिळवले आहे. या खेळाचे भारतात लोकप्रिय होण्याचे अजून एक कारण असे आहे की जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी शहरात जागेची कमी निर्माण होत आहे, आणि कारण बॅडमिंटन खेळायला खूप कमी जागा लागते म्हणून बॅडमिंटन ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Source: Internet

Post a Comment

أحدث أقدم