माती पासून कंठहार तयार करणे
माती पासून कंठहार तयार करणे
साहित्य व साधने: ओली माती, लाकडी कोरणे ,काडी, दोरा ,पेनाचे टोपण, गोंद ,कापूस इत्यादी.
कृती -
१)मातीचे आठ छोट्या मण्यांच्या आकाराचे गोळे, चार लंबगोल व एक मोठ्या आकाराचा चपटा गोळा तयार करून घ्या. गुंफण करण्याकरिता एका बाजूस दोन बोटांने चिमटीत धरून आकार तयार करा. व लाकडी कोरणे, काडी/ पेनाच्या टोपणाने नक्षी कोरा . गुंफण करण्याकरिता काडीने छिद्र करा.
२)आकार सुकण्यास ठेवा व प्रथम पांढऱ्या व नंतर आवडीप्रमाणे रंग द्या.
३)रंग सुकल्यानंतर गुंफण्या पूर्वी कच्ची रचना करून ,नंतर छिद्रामधून दोरा ओवा.
४)गुंफन पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूस गाठी मारा व टोकास गोंडे तयार करून बांधा.
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment