योगासने - शवासन Shavasan
शवासन
मूळ स्थिती :
पाठीवर झोपा.
आसन स्थिती : दोन्ही पायात अंतर ठेवा.पावले जमिनीकडे कलती करा.दोन्ही हात शरीराजवळ परंतु हवे तेवढे बाजूला ठेवा. तळवे आकाशाकडे. मान थोडी डावीकडे कललेली ठेवा. संपूर्ण शरीर शिथिल करा. डोळे बंद करा सावकाश श्वास घ्या.तेंव्हा पोट वर आले पाहिजे.
सावकाश श्वास सोडा तेव्हा पोट आत गेले पाहिजे.
फायदे
१) थकलेल्या शरीराला व मनाला पूर्ण विश्रांती मिळते.
२) थकवा नाहीसा होऊन उत्साह निर्माण होतो.
३) हृदयाची क्षमता वाढते.
४) रक्तदाब नियंत्रित राहतो.
إرسال تعليق