माझा आवडता खेळ खो खो

 माझा आवडता खेळ खो खो 

माझा आवडता खेळ खो खो


भारतातली लोकप्रिय खेळांपैकी एक असलेला खोखो माझा आवडता खेळ आहे. कब्बडी खेळाप्रमाणेच खोखो हा आपल्या देशाचा पारंपरिक खेळ आहे. प्राचीन काळापासून खो खो चा खेळ खेळला जात आहे. खो खो चे जन्मस्थान बडोदा शहराला मानले जाते. हा खेळ गुजरात सोबत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब प्रांतात प्रसिद्ध आहे. या खेळाला खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या महागड्या साहित्याची आवश्यकता नसते. म्हणूनच काही लोकांचे मानणे आहे की खोखो हा खेळ गरिबांचा खेळ आहे. परंतु जर खो खो गरिबांचा खेळ राहिला असता तर तो भारतात एवढा लोकप्रिय झालाच नसता. 


आज गावागावात खो खो चा खेळ खेळला जातो. मला हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ खेळायला आवडते. परंतु या सर्वांमध्ये जो खेळ मला सर्वाधिक आवडतो तो म्हणजे खो खो होय. खोखो हा खेळ खूप साहसी खेळ आहे. या खेळाला खेळताना शरीराला इजा होण्याची देखील शक्यता असते. परंतु नरम वाळू मध्ये खेळल्याने जास्त इजा होण्याची शक्यता टाळता येते. मला लहानपणापासून खो खो खेळण्याची आवड आहे. तुम्ही असेही म्हणू शकता की माझे अर्धे बालपण खो खो खेळण्यात गेले आहे. आणि मी बऱ्याचदा खो खो खेळण्यासाठी जिल्हा स्तरावर देखील गेलो आहे. खो खो मध्ये उत्तम खेळाडू म्हणून माझी ओळख आहे. आणि यासाठी मला अनेक पुरस्कार व ट्रॉफी मिळाल्या आहेत.


खो खो चे खेळ खेळणे खूप सोपे आहे. या खेळात खूप कमी नियम असतात. खो खो खेळात दोन संघ असतात. प्रत्येक संघात 9 सदस्य असतात. या खेळल्या खेळणाऱ्या खेळाडू मध्ये स्फूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. खो खो ला खेळण्यासाठी 111 फूट लांब आणि 51 फूट रुंद मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या दोन्ही बाजूला थोडी थोडी जागा सोडून 4-4 फूट उंच लाकडाचे खांब लावले जातात. खो खो खेळताना कोणत्याही एका संघाचे 8 खेळाडू या खांबांच्या मधोमध एका रांगेत एकमेकांकडे पाठ करून बसतात. आणि दुसऱ्या संघाचे खेळाडू पडतात. हा खेळ मोकळ्या मैदानात खेळाला जातो. 


मला माझ्या मित्रांसोबत खो खो खेळायला खूप आवडते. खोखो खेळल्याने मला आनंदाची प्राप्ती होते. खो खो खेळण्याचे अनेक स्वास्थ्यवर्धक फायदे आहेत. खो खो खेळल्याने शरीराचे हाड मजबूत होतात. या खेळाला खेळल्याने विचार करण्याची क्षमता वाढते. जीवनात ताणतणाव कमी वाटतो. खो खो खेळल्यानंतर मला खूप ऊर्जावान वाटते. अशा पद्धतीने खो खो खेळण्याचे अनेक फायदे असल्याने प्रत्येकाने खो खो खेळायला हवे.


मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

हिंदी विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

English विषयातील निबंध पाहण्यासाठी क्लिक करा

Source: Internet

Post a Comment

أحدث أقدم